न्यायालयात हजर होताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नका; संजय सिंह यांना न्यायालयाचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयात हजर होताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नका, असे निर्देश दिल्लीतील न्यायालयाने आपचे खासदार संजय सिंह यांना दिले आहेत. असे केल्याने सुरक्षेसंदर्भात अडचणी निर्माण होतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर होताना सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत इमानदार जनता आमच्यासोबत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

सिंह यांना अटक झाल्यानंतर 5 ऑक्टोबरला त्यांना ईडी कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यात 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. तपास यंत्रणांना त्यांची चौकशी करायची असल्याने ही वाढ करण्यात आली होती. माजी उपमुख्यमंत्रई मनीष सिसोदिया यांच्या मदतीने मद्यघोटाळ्यातील लाभार्थिंना संजय सिंह यांना फायदा करून देण्याचा वादा केला होता, असा आरोप ईडीने केला आहे.