पालघरमध्ये दारू तस्करांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस कर्मचारी जखमी

पालघरमध्ये दारू तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पालघरच्या तलासरी भागात काही दारू तस्कर केंद्र शासित प्रदेश दमणहून दारू आणत होते.

तेव्हा पोलीस त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. तेव्हा तस्करांनी गाडी तिथेच टाकून पळ काढल. नंतर तेच दारू तस्कर 20-25 जणांना घेऊन आले आणि पोलिसांवर हल्ला केला. तसेच पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात के पोलीस उपनिरीक्षक आणि शिपाई जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या