शेंडीत दारू पकडली;व्होडका, व्हिस्कीचे 256 बॉक्स ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

सामना ऑनलाईन, नगर

व्हाईट मिस्चीफ वोडका, ब्लॅक डिलक्स व्हिस्की, डॉक्टर स्पेशल व्हिस्कीसारख्या मद्याची तस्करी करणारा टेम्पो नगर पोलिसांनी पकडला आहे. या दारूची किंमत साडेसोळा लाख रूपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी भगवान बन्सी बढे (वय-४० वर्षे, रा. भिलवडे. ता-पाथर्डी) याला अटक केली आहे. शेंडी बायपास चौकातून संभाजीनगराकडे जाण्यासाठी टेम्पो वळवला आणि तिथेच पोलिसांनी ही कारवाई केली.