Photo – जगातील ‘या’ 5 देशांमध्ये विमानतळच नाही, मग इतर देशात प्रवास कसा करतात?

दोन देशातील सिमा पार करण्यासाठी बहुतांशवेळा हवाई मार्ग (विमान, हेलिकॉप्टर) किंवा सागरी मार्ग (जहाज) याचा वापर केला जातो. विमान प्रवास हा आरामदायक तर असतोच शिवाय यामुळे वेळही वाचतो. त्यामुळे बहुतेक लोकं दोन देशातील प्रवासासाठी विमानाचा सर्वाधिक वापर करतात. पण जगात असेही काही देश आहेत जिथे विमानतळच नाही. या देशांबद्दल जाणून घेऊ…

1. लिकटेंस्टाईन (Liechtenstein) –

डोंगराळ भागात असणाऱ्या या देशाचे क्षेत्रफळ अवघे 160 चौरस किलोमीटर आहे. डोंगराच्या कड्याकपाऱ्यावर घरं असल्याने या देशात विमानतळ उभारणे अशक्यच आहे. मात्र येथील नागरिक विमान प्रवास करायचा असल्यास 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या झुरिच विमानतळावर जातात.

2. अंडोरा (Andorra) –

स्पेन आणि फ्रान्स या देशांच्या मध्ये वसलेला हा देश छाटासा असून पर्वतरागांनी व्यापलेला आहे. समुद्रसपाटीपासून 3000 फुटांपर्यंत वसलेल्या या देशात विमानतळ नाही. या देशापासून सर्वात जवळचे विमानतळ प्रिन्सिपॅलिटी, कॅटालोनियाचे अँडोरा-ला सियु विमानतळ आहे. अंडोरापासून हे विमानतळ 30 किलोमीटर अंतरावर आहे.

3. व्हॅटिकन सिटी (The Vatican City) –

जगातील सर्वात लहान देशात समावेश होणाऱ्या व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ अवघे 0.44 चौरस किलोमीटर आहे. रोमच्या मध्यभागी असलेला हा देश ना समुद्राने जोडलेला आहे ना, हवाई मार्गाने. येथील लोकांना विमान प्रवास करण्यासाठी iumicino आणि Ciampino विमानतळांवर जावे. तिथून रेल्वेने या देशात येण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी लागतो.

4. मोनॅको प्रिंसिपॅलिटी (Monaco Principality) –

या देशातही एकही विमानतळ नाही. मात्र हा देश रेल्वेने जोडलेला असून या देशाची लोकसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. हवाई सेवेसाठी या देशाचा नाइस देशाची करार आहे.

5. सॅन मारिनो (San Marino) –

व्हॅटिकन सिटी आणि रोमपुासून जवळ असलेला हा देश इटलीने वेढलेला आहे. या देशाचा परिघ 40 किलोमीटरपेक्षाही कमी असून येथे एकही विमानतळ नाही. मात्र या देशापासून 16 किलोमीटर अंतरावर रिमिनी विमानतळ आहे. यासह व्हेनिस, पिसा, फ्लॅरेन्स आणि बोलोग्ना या विमानतळांचाही पर्यात या देशाच्या नागरिकांकडे आहे.