Live- अजित पवार यांना अश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-in-speech

  • आपचा पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यामागे कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे – धनंजय मुंडे
  • चौकशीला आक्षेप नाही, मात्र, चौकशी लवकर पूर्ण करून योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे
  • शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार ते सांगतील तसे वागणार
  • पक्ष सोडून जाणाऱ्यांवर कधीही टीका केली नाही
  • आम्ही कुठेतरी कमी पडलो, जवळचे सहकारी पक्ष सोडून गेले
  • पत्रकार परिषदेत भावनात्मक होत अजित पवार यांना अश्रू अनावर
  • आता आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे
  • शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला दिला
  • पवार कुटंबामध्ये कुटुंबप्रमुखांचे निर्णय सगळ्यांना मान्य असतात
  • पवार कुटुंबीयांमध्ये कोणतेही वादविवाद नाही, कोणताही गृहकलह नाही
  • बारमतीमध्ये पूरपरिस्थिती असल्याने आपण बारामतीमध्ये होतो, त्यावरूनही चुकीचे वृत्त देण्यात आले
  • राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अनेक चुकीचे वृत्त दिले
  • सरकार म्हणते आमचा निर्णय नाही, न्यायव्यवस्थेचा निर्णय आहे, न्यायव्यवस्थेबाबत आपल्याला आदर आहे
  • आपल्यामुळे या वयात शरद पवार यांची बदनामी होत असल्याने कोणलाही न सांगता राजीनामा दिला
  • आपल्यामुळेच शरद पवार यांचे नाव यात घेण्यात आल्याने व्यथीत होऊन हा निर्णय घेतला
  • अजित पवार यांचे नाव असल्याने आणि आपले शरद पवार यांच्याशी नाते असल्याने त्यांचे नाव यात घेण्यात आले
  • शरद पवार सभासद किंवा सदस्य नाही, त्यांचा दूरान्वयेही संबंध नसताना त्यांचे नाव गोवले गेले
  • ठेवीच्या रकमेपेक्षा मोठ्या रकमेचा घोटाळा कसा – अजित पवार यांचा सवाल
  • सहकारक्षेत्रात कारखाने आणि बँकांना मदत करण्यासाठी काहीवेळा चौकटीबाहेरचे निर्णय घ्यावे लागतात
  • सहकारी कारखाने आणि बँका चांगल्याप्रकारे चालत आहे
  • भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, मात्र, एवढा भ्रष्टाचार झाला असेल तर बँक कशी चालेल
  • ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, असे अनेक दिवसांपासून आपल्या मनात होते
  • या घटनेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या, त्यांची आपण माफी मागतो
  • कोणालाही कल्पना दिली नसल्याने संभ्रम निर्माण झाला
  • सद्सद् विवेक बुद्धीने निर्णय घेऊन राजीनामा दिला- अजित पवार
  • दादा स्पष्टवक्ते आहेत तितकेच ते भावूक आहेत- जयंत पाटील
  • राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रस्तावना करत पत्रकार परिषदेला सुरुवात केली.
  • अजित पवार यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल
  • दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन अजित पवार भूमिका स्पष्ट करणार
  • ajit-pawr-pc
  • अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल ते स्वतःच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगतील- शरद पवार
  • घरात कुठलाही वाद नाही. तसंच चिंता करण्याचं कारण नाही, शरद पवार यांचे स्पष्टीकरण
  • अजित पवार यांची धनजंय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील- शरद पवार
  • पवार कुटुंबीयांची बैठक संपली
  • सिल्व्हर ओकमध्ये फक्त पवार कुटुंबीयांमध्येच बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते या बैठकीत सामील झालेले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
  • धनंजय मुंडे सिल्व्हर ओकमध्ये दाखल, माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार
  • अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवारही सिल्वर ओकमध्ये दाखल
  • या बैठकीला सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेही उपस्थित राहणार
  • शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांची भेट
  • अजित पवार हे शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
  • यामुळे त्यांना शोधणाऱ्या पत्रकारांची चांगलीच दमछाक झाली.
  • अजित पवार हे राजीनामा दिल्यापासून कुठे आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. शनिवारी अचानक ते मुंबईत असून पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं.
  • त्यांनी हा निर्णय का घेतला हे आपल्यालाही माहिती नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं म्हणणं आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला.