विमानतळावरून जिवंत वन्यजीव जप्त; कस्टमची कारवाई

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई केली. कारवाई करून जिवंत आणि मृत वन्यजीव प्रजाती जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाने अटक केली.

वन्य जीव तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. एक प्रवासी हा विमानतळावर येणार असून त्याच्याकडे वन्यजीव असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. शनिवारी अटक प्रवासी हा विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साहित्याची तपासणी केली. त्याच्याकडून  स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वाइपर ः 03 जिवंत नमुने, आशियाई पानांचे कासव ः 05 जिवंत नमुने आणि इंडोनेशियन पिट वाइपर ः 44 नमुने जप्त केले.