LIVE – भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंडखोरी करत सत्तेत आलेल्या नव्या सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घाट घातला आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवी, तर भाजपचे राहुल नार्वेकर रिंगणात असले तरी खरा सामना हा शिवसेना विरुद्ध बंडखोर शिंदे गट असा रंगणार आहे… वाचा अधिवेशनाचे सर्व लाईव्ह अपडेट

– ही नावे लिहून घ्यावीत असे आदेश विधानसभा सचिवांना दिले

– शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षदेशाच्या विरोधात मतदान केले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही बाब सभागृहाच्या रेकॉर्डवर ही बाब असून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ही उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले

– भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

– समाजवादी पार्टी व एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले

– राजन साळवी यांना 107 मतं

–  भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं

– शिरगणतीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

– विधानसभेचे विशेष अधिवेशन, अध्यक्षाच्या निवडीला सुरुवात

– अजित पवार यांची कोरोना चाचमी निगेटिव्ह, अधिवेशनासाठी विधीमंडळात पोहोचले.

– आदित्य ठाकरे विधीमंडळात पोहोचले

–  सर्व बंडखोर आमदार विधीमंडळात पोहोचले