Live – देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 694 वर; 16 जणांचा मृत्यू

6933

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांसाठी देशभरात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 600 च्यावर गेली असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाविरोधातील लढ्यासाठी हे 21 दिवस महत्त्वाचे आहेत.

 • देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 694 वर; 16 जणांचा मृत्यू

 • 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात करोनामुळे मृत्यू
 • नागपूरमध्ये एका 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण, महाराष्ट्रातील आकडा 125 वर

 • बँक, शाखा, बँक मित्र, एटीएम, रुपे कार्ड हे सगळे लॉकडाऊनमध्ये वगळण्यात आलं आहे. खात्यात जमा झालेली रक्कम रुपे कार्डाचा वापर करून एटीममधून काढू शकतात किंवा बँक मित्र घरी येईल त्यांच्याकडून खात्यातून रक्कम काढू शकतात
 • आम्ही 36 तासात ही मदत जाहीर केली आहे. सध्या ज्यांना तातडीने मदत आवश्यक आहे त्यांच्यासाठी ही मदत जाहीर केली आहे. – निर्मला सितारामन
 • या फंडातून बांधकाम क्षेत्रातील कामगारां मदत द्यावी, राज्य सरकारला निर्देश
 • बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भल्यासाठी 31 हजार कोटींचा फंड आहे. यात साडेतीन कोटी मजूर नोंदणीकृत आहेत.
 • ईपीएफओमध्ये असलेल्या रकमेतून कामगार 75 टक्के रक्कम किंवा नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स म्हणून काढू शकतात किंवा तीन महिन्याचा पगार यातील जी रक्कम कमी असेल ती काढू शकतात

 • ज्या उद्योगामध्ये कर्माचाऱ्यांची संख्या 100 हून कमी आहेत अशांना आणि उद्योगामध्ये काम करणाऱ्या 90 टक्के कर्मचाऱ्यांचापगार 15 हजार पेक्षा कमी पगार असलेल्यांना हा फायदा मिळणार
 • संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सरकार ईपीएफचा सरकार आणि कर्मचाऱ्याचा हिस्सा जो एकूण 24 टक्क्यांच्या घरात जातो तो पुढचे तीन महिने भरणार
 • देशामध्ये 63 लाख महिला बचत गट आहेत. तारणाशिवाय 10 ऐवजी 20 लाखांचे कर्ज मिळणार. 7 कोटी कुटुंबाना फायदा होणार
 • उज्ज्वला योजनेतील गरिबी रेषेखाली राहणाऱ्या 8 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेतील महिलांना इंधनाचा तुटवडा होऊ नये म्हणून त्यांना पुढचे 3 महिने मोफत गॅस सिलिंडर देणार

 • 20 कोटी जनधन खातेधारक महिलांना 500 रुपये महिना पुढचे 3 महिने मिळणार

 • 3 कोटी गरीब वृद्ध, दिव्यांग आणि गरीब विधवांना 1000 रुपये दोन टप्प्यात पुढच्या 3 महिन्याच मिळणार
 • मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांना 182 ऐवजी 202 रुपये मजुरी मिळणार
 • एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 2 हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, 8.69 कोटी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार
 • 80 कोटी गरीबांपैकी कोणीही अन्नाशिवाय राहू नये हा प्रयत्न आहे.. प्रत्येकाला 5 किलो गहू तांदूळ पुढचे तीन महिने मोफत मिळणार, याशिवाय 1 किलो आवडीची डाळही मोफत मिळणार
 • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर
 • 20 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळेल
 • या सगळ्यांसाठी विमा कवच जाहीर करण्यात आले असून त्यांना50 लाख प्रति व्यक्ति विमा कवच
 • स्वच्छता कर्मचारी, आशाताई, डॉक्टर, नर्स जे कोणी या संकटाशी झुंजत आहे त्या सगळ्यांप्रती मी आभार मानते
 • पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज

 • अर्थमंत्री निर्मला सिथारामन यांची पत्रकार परिषद
 • राज्यातील कोरोनाच्या 18 रुग्णांना डिस्चार्ज

 • राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत असून आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
 • MIM च्या आमदाराची डॉक्टरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ

 • जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जाते आहे- बाळासाहेब थोरात

 • मुंबईत कोरोना व्हायरसमुळे 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

 • कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून कर्नाटकात एकाची आत्महत्या

 • मुंबई-ठाण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले, महाराष्ट्रातील आकडा 124 वर

 • कोरोना व्हायरसमुळे श्रीनगरमध्ये एकाचा मृत्यू, देशभरातील मृतांचा आकडा 15 वर

 • बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली गरजूंसाठी 50 लाखांचा तांदूळ दान करणार

 • सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून पोलिसांना पाणी व जेवणाचे वाटप

 • राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती थांबवण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूकमंंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला
 • इटलीमध्ये आतापर्यंत 7503 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
 • गोव्यामध्ये कोरोनाचे 3 रुग्ण सापडले आहेत, तिघेही परदेशात (स्पेन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका) जाऊन आले होते

 • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे G20 समूहातील देश कोरोनाच्या संकटाशी मुकाबला कसा करायचा यावर मंथन करणार आहे

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज #G20VirtualSummit मध्ये सहभागी होणार. 
 • पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या तीन रुग्णांची तपासणी पुन्हा करण्यात आली आहे. या रुग्णाची पुन्हा चाचणी केली असता या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 • जम्मू-काश्मीर प्रशासनाने सांगितले की जे परदेशातून प्रवास करून आले आहेत अशा सुमारे 1750 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 606 वर, मृतांचा आकडा 10

 • जगप्रसिद्ध हिंदुस्थानी वंशाचे शेफ फ्लोयड कार्डोज यांचा कोरोनामुळे मृत्यू

 • स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 724 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122, मुंबईत आढळले 5 रुग्ण

 • इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना व्हायरसची लागण

 • आज तपासणी झालेल्या 103 संशयितांपैकी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे सर्व परदेशात प्रवास करून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन जण मुंबईचे तर दोन जण मुंबई बाहेरील आहेत
 • कोरोना व्हायरसमुळे पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

 • चेन्नईत पाच जणांना कोरोनाची लागण, चार इंडोनेशियन पर्यटक व त्यांच्या गाईडचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह

 • वसईत लाॅकडाऊन दरम्यान टवाळखोर तरूणांनी भरधाव दुचाकीने पोलिस उपनिरीक्षकाला उडविले

 • मुंबईच्या विमानतळाच्या कार्गो टर्मिनल जवळील एका गोदामातून पोलिसांनी एक कोटी रुपये किमतीचा मास्कचा साठा जप्त केला

 • संकटावर मात करून विजयाची गुढी उभारून आपल्याला गुढी पाडवा साजरा करायचाय
 • भाजीपाल्याचीही दुकाने बंद होणार नाही, झुंबड करू नका
 • जीवनावश्यक वस्तू आणायच्या असतील तर एकट्या-दुकट्याने जा
 • माणुसकीच्या धर्माने कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थांबवू नका
 • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • काही जण असे आहेत ज्यांना घर नाही, त्यांची सरकार पूर्ण खबरदारी घेत आहे
 • मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो आहे, तुम्ही तुमच्या घरातील गृहमंत्र्यांचे ऐका
 • केंद्राकडून एक सूचना आली आहे की शक्यतो एसी बंद करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • बऱ्याच वर्षांनी कुटुंब एकत्र आली आहेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • घराबाहेर पाऊल टाकलं तर कोरोना तुमच्या घरात पाऊल टाकेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद- अजित पवार
 • एकमेकांपासून अंतर राखत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, अमित शहांनी शेअर केला फोटो

 • सांगली जिल्ह्यातील यापूर्वीचे सापडलेले कोरोनाचे रुग्ण आणि आजचे 5 रुग्ण हे एकाच कुटुंबातील आहेत
 • सांगली जिल्ह्यातील आणखी 5 जणांना कोरोनाची लागण
 • गुरुवारी दुसरा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तर हे तिघे देखील दोन दिवसांत घरी परतू शकतात
 • पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे
 • तिघांची पहिली चाचणी झाली, उद्या दुसरी चाचणी
 • या दांपत्याच्या संपर्कात 3 जण आले होते
 • नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळालेली ही आनंदाची बातमी आहे- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
 • हे दांपत्य दुबईवरून परतले होते
 • राज्यातील पहिले 2 कोरोनाग्रस्त बरे झाले, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

पुण्यातील कोरोनाग्रस्त दांपत्य ठणठणीत बरे झाले, आज घरी परतणार

 

 • कोरोनामुळे देशभरात 9 जणांचा मृत्यू

 • देशभरात कोरोनाची लागण झालेल्या मात्र आता ठणठणीत बऱ्या झालेल्यांची संख्या 41 झाली आहे
 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 562 पर्यंच पोहोचला
 • संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांनी अंतर राखत जीवनावश्यक गोष्टींची खरेदी केली

 • 277 नागरीक बुधवारी पहाटे जोधपूरला पोहोचले

 • इराणमध्ये अडकलेल्या 277 हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप मायदेशी आणले
 • इंदूरमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे

 • सेन्सेक्स 464 अंकानी वधारला
 • या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत देशभरात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे
 • या वृत्तवाहिनीनुसार 560 पैकी 46 जण बरे झाले आहेत, त्यामुळे सध्या 504 जण सध्या बाधित आहे
 • देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 560 झाल्याचे आजतक या वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे
 • चैत्र नवरात्री आणि गुढीपाडव्याला गजबजणाऱ्या मंदिरांध्येही यंदा लॉक डाऊनमुळे शुकशुकाट
 • ल़ॉक डाऊनच्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसी राव यांचे निर्देश
 • कोरोना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप
 • लॉक डाऊनच्या काटेकोर अंलबजावणीला सुरुवात
 • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
 • वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांची चर्चा
 • तामिळनाडूत कोरोना रुग्णांचा मृत्यू; मृतांची संख्या 11 वर
आपली प्रतिक्रिया द्या