पक्षाचे निर्णय कटू वाटले तरी त्यांचं स्वागत आहे- एकनाथ खडसे

1577

#MahaElection 2019 भाजप नेते एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाली नाही. खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करूनही त्यांचं नाव भाजपच्या यादीत नव्हतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, भाजपच्या तिसऱ्या यादीत खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

वाचा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

 • तुम्ही जसे माझ्या पाठीशी उभे राहिलात तसे तिलाही सहकार्य करा, खडसे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
 • हा पक्षाचा निर्णय मान्य आहे. रोहिणी हिच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करू.
 • रोहिणी यांना सहकार्य करून भाजपला एकमताने निवडून आणा
 • अन्य पक्षाचा कुणी निवडून येण्यापेक्षा आपल्या घरातला, पक्षाचा माणूस निवडून आलेला केव्हाही चांगला
 • त्यामुळे एकमताने तिला निवडून आणण्याची जबाबदारी आहे.
 • ती फक्त माझी मुलगी म्हणून नव्हे तर नेता म्हणून काम करणार आहे.
 • आता रोहिणीची निवड झाली आहे.
 • आताही निर्णय कटू वाटले तरी त्याचं स्वागत आहे.
 • गेल्या 40 वर्षांपासून पक्षाने जो आदेश दिला त्याचं पालन आपण केलेलं आहे.
 • मी गेल्या 40 वर्षांपासून मी तुमच्या सहकार्याने कार्यरत आहे
 • गेल्या काही दिवसांपासून आपल्या भागात कोण उमेदवार असेल याची उत्सुकता होती.
 • भाजप नेते एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू
आपली प्रतिक्रिया द्या