लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, पण लिव्ह इन पूर्वीचा करार दाखवून आरोपीने मिळवला जामीन

एका 46 वर्षीय व्यक्तीने एका 29 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आहे. पण या आरोपीने पीडितेकडून रिलेशनशिपपूर्वी एक करार लिहून घेतला होता. त्यामुळे आरोपीला जामीन मिळाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की एक 29 वर्षीय महिलेची या 46 वर्षाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. ही महिला एका एनजीओमध्ये काम करायची. तर ही व्यक्ती सरकारी कर्मचारी होती. दोघांची ओळख झाल्यानंतर ही महिला एकदा आरोपीच्या घरी गेली होती. आपण घटस्फोटित आहोत असे या व्यक्तीने या महिलेला सांगितले. तसेच पहिल्या लग्नापासून आपल्याला एक मुलगा आहे असेही या व्यक्तीने या महिलेला सांगितले.

नंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आरोपी आपल्या मित्रासोबत अलिबागल जाणार होता. तेव्हा आरोपीने महिलेलाही अलिबागला नेले आणि तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. या संबंधातून महिला गरोदर राहिली तेव्हा आरोपीने आपल्याला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोपही पिडीत महिलेने केला. जानेवारी महिन्यात आरोपीने महिलेला घरी बोलावले. तेव्हा आरोपीच्या घरात एक महिला होती, ही महिला आरोपीची पत्नी असल्याचे महिलेला कळाले. त्यानंतर 23 ऑगस्टला महिलेने आरोपीविरोधात तक्रार केली. पण आरोपीने आपला महिलेसोबत करार झाला आहे असे सांगितले. आणि याच कराराच्या आधारावर आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

या करारात अटी लिहिल्या होत्या की 1 ऑगस्ट 2023 ते 30 जून पर्यंत दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये येतील, या काळात दोघे शांततेने राहतील आणि एकमेकांविरोधात लैंगिक छळाची तक्रार करणार नाही. स्त्रीने आपल्या पार्टर्नरला कोणताही मानसिक त्रास देऊ नये. या नात्यात महिला गरोदर राहिली तर ही जबाबदारी संपूर्णपणे तिची राहिल, त्यासाठी पार्टर्नर जबाबदार राहणार नाही. इतकंच नाही तर या नात्यात पार्टर्नरला मानसिक त्रास झाला आणि त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला तर त्यासाठी महिला जबाबदारी असेल.

या करारावर पीडित महिलेची सही होती. आरोपीच्या वकिलांनी म्हटले के दोघेही संमंतीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, माझ्या अशीलाला खोट्या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचे वकिलांनी म्हटले आहे. हा करार पाहून कोर्टाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.