LIVE- छोटे कुटुंब ही देखील एक देशभक्तीच, लोकसंख्यावाढीच्या गंभीर मुद्द्याला पंतप्रधानांनी घातला हात

832

 • रसायनविरहीत शेतीवर भर देण्याची गरज आहे, धरणीमातेला वाचवण्यासाठी हे काम होणे गरजेचे आहे
 • 2022 पर्यंत देशातील कमीत कमी 15 पर्यटनस्थळांना भेट देऊ असे प्रत्येक कुटुंबाने उद्दीष्ट ठेवल्यास आपल्या देशाच्या महत्तेबद्दल नव्या पिढीला कळेलच शिवाय रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल
 • अधिकाधिक व्यवहार डिजिटल माध्यमातून करण्याचे देशवासीयांना आवाहन
 • 2 ऑक्टोबरपासून प्लॅस्टीकमुक्त देशाची चळवळ सुरू करण्याचे देशवासीयांना पंतप्रधानांचे आवाहन

 • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करणार
 • दहशतवाद पसरवणाऱ्यांचा समूळ नायनाट करणे गरजेचे
 • या सरकारने महागाई दर नियंत्रणात ठेवलाच शिवाय विकास दरवाढीलाही चालना दिली
 • देशातील राजकीय स्थिरतेकडे संपूर्ण जग आदराने बघत आहे, याचा आपण फायदा उचलला पाहिजे
 • पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणे गरजेचे आहे, पर्यटनामुळे कमीत कमी गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळते
 • जागतिक बाजार काबीज करण्याचे स्वप्न पाहिल्यास तरुणांना मोठ्या प्रमाणावर काम मिळू शकते
 • प्रत्येक जिल्हा एक्स्पोर्ट हब का बनू शकत नाही ?
 • 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट पुढच्या पाच वर्षात गाठणे अशक्य नाहीये
 • अवघड काम केले नाही, अवघड समस्या नाही सोडवल्या तर प्रगती कशी होईल?
 • आता जनता कामाचा हिशोब मागायला लागली आहे
 • भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान झाले आहे-पंतप्रधान
 • लोकांच्या जीवनातील सरकारचा दखल कमी करण्याची गरज
 • सरकारचा दबावही नको आणि सरकारचा अभावही नको, सरकार एका साथीदाराप्रमाणे असावे
 • छोटे कुटुंब म्हणजे हे देशभक्तीचे कार्य आहे
 • देशात एक जागरूक वर्ग आहे, जो लोकसंख्या वाढीच्या समस्या चांगल्या पद्धतीने जाणतोय-पंतप्रधान
 • लोकसंख्येचा विस्फोट हा आपल्यासाठी अनेक संकटे निर्माण करीत आहे-पंतप्रधान
 • आज देशात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबत चर्चा सुरू झाली आहे-पंतप्रधान

 • विपरीत परिस्थितीशी झुंजण्याची ताकद गरिबांमध्ये आहे
 • देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरिबी हटवावीच लागेल
 • सुधारणेची तुमच्यात हिम्मत नव्हती, इरादा नव्हता -पंतप्रधान (कमल 370 हटविण्यावरून काँग्रेसवर शरसंधान)
 • 370 हटविण्याची मागणी आजपर्यंत अनेकदा करण्यात आली, राजकीय पक्षांनी बहुमत असतानाही कलम 370 का हटविण्यात आले नाही-पंतप्रधान
 • हम समस्या को टालते भी नहीं हैं, और समस्या को पालते भी नहीं हैं-पंतप्रधान
 • जी गोष्ट 70 वर्षात झाली नाही ती 70 दिवसांत झाली-पंतप्रधान
 • कलम 370 नव्या सरकारने सत्तेत विराजमान होताच 70 दिवसांत हटविले-पंतप्रधान
 • कलम 370 हटवण्याचा निर्णय दोन्ही सदनांनी दोन तृतीयांश बहुमताने घेण्यात आला-पंतप्रधान
 • समस्यांपासून पळ काढण्याचा किंवा टाळण्याची ही वेळ नाही-पंतप्रधान
 • हिंदुस्थानात मात्र मुसलमान भगिनींना हा हक्क देण्यासाठी संकोच केला जात होता-पंतप्रधान
 • अनेक मुस्लिमबहुल देशांनी तीन तलाकची कुप्रथा बंद केली होती-पंतप्रधान
 • मुसलमान महिला, तरुणींच्या मनात तीन तलाकचे भय घर करून होते-पंतप्रधान
 • समस्या मुळापासून संपवण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे-पंतप्रधान
 • 2019 सालच्या निवडणुकीत निराशा आशेत बदलली होते, लोकांच्या मनात ही भावना निर्माण झाली होती की ‘हो देश बदलू शकतो’
 • बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा बनविणे आवश्यक होते,ते काम आम्ही केले-पंतप्रधान
 • दहशतवादविरोधी कायद्यात आमूलाग्र बदल करण्यात आला-पंतप्रधान
 • महिलांना तीन तलाकपासून मुक्ति मिळाली-पंतप्रधान
 • कलम 370, 35(A) हटवणे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार करण्याप्रमाणे आहे-पंतप्रधान
 • नने सरकार 10 आठवड्यांच्या काळात लोकांच्या आशा आकांशा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सेवेत मग्न झाले आहे-पंतप्रधान
 • नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मला पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून तुम्हा सगळ्यांचा गौरव करण्याची संधी मिळाली आहे-पंतप्रधान
 • पूरग्रस्त भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे-पंतप्रधान
 • देशाच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे-पंतप्रधान
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
आपली प्रतिक्रिया द्या