मराठा आरक्षण: विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नंदुरबार / पुणे / संभाजीनगर

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. यासाठी ‘मुक’ मोर्चानंतर सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याने संतापलेला मराठा समाज आता ‘ठोक’ मोर्चा पर्यंत येऊन पोहोचला आहे. मुंबई पाठोपाठ आता ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. या आंदोलनाचे सारे अपडेट पुढील प्रमाणे.

LIVE मराठा आरक्षण आंदोलन:

  • चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, शेकडो गाड्यांची तोडफोड

chakan

  • सोलापूरमध्ये आंदोलकांनी टायर जाळली… पोलिसांनी केला लाठीचार्ज…


  • वाचा सविस्तर बातमी: आता मरायचे नाही मारायचे, मराठा आंदोलकांच्या घोषणांनी कोल्हापूर दणाणले
  • मराठा आरक्षणासाठी तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर मराठा आंदोलकांनी जालना रोडवर रास्तारोको करून वाहतूक रोखून धरली
  • jalna-road-1
  • चाकणमध्ये नऊ गाड्यांची तोडफोड
  • धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक
  • सोलापूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, शिवाजी चौक परिसरात दगडफेक झाल्याचे वृत्त
  • नवी पेठ भागातून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती
  • पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
  • पंढरपूरमध्ये एसटीची तोडफोड, काही काळ तणावाचं वातावरण
  • पुणे जिल्ह्यात १०० टक्के बंद
  • पुण्यातील कोथरूड भागात मराठा आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा देत आरक्षणाची मागणी केली (फोटो: चंद्रकात पालकर)

maratha-morch-kothrud

  • मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची फेसबुकवरून दिली माहिती
  • संभाजीनगर: मुकुंदवाडी परिरातील एका युवकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
  • मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर बंदची हाक दिलेल्या शहरांत पोलीस बंदोबस्त वाढवला

grain-marketyard

  • पुण्यातही आंदोलनाचे पडसाद, गुलटेकडी मार्केटयार्ड बंद (फोटो: चंद्रकांत पालकर)

market-yard-gultekadi-pune

  • पंढरपूरजवळ देखील एसटीला लक्ष्य करण्यात आलं, अनेक भागात एसटी बस सेवा ठप्प
  • काही ठिकाणी एसटीबसला लक्ष्य करण्यात आलं, बस सेवा बंद
  • सोलापूर जिल्हा बंदची हाक, व्यापारी संघटनांनी बंदला दिला पाठिंबा
  • सोलापूरमध्ये मराठा आंदोलन पेटलं
  • नंदुरबारमध्ये मराठा समाजाकडून बंदची हाक, दुकानं-बाजारपेठा बंद