देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केलं. त्याच वेळी देशातील गरीब, मजूर, कष्टकरी जनतेसाठी सरकार झटत असल्याचे स्पष्ट केले. त्याच बरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळीपर्यंत, अर्थात नोव्हेंबर अखेर पर्यंत केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
पंतप्रधान मोदी यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे:
https://www.facebook.com/saamanaonline/videos/597341680980438/
- 2 फूट दूरी, मास्क वापरणे, हात वेळोवेळी धुणे हे नियम कटाक्षाने पाळा
- याच संकल्पासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे, पुढे जायचं आहे
- येत्या काळात देशातल्या प्रत्येक घटकाला सशक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत
- आत्मनिर्भर देशासाठी दिवसरात्र मेहनत करणार आहोत.
- या देशातल्या प्रत्येक प्रामाणिक करदात्याला माझा सलाम
- तुमच्यामुळेच गरीबाघरची चूल पेटत आहे
- तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे देश ही मदत करू शकतोय
- सरकार ज्यांच्यामुळे हे सगळं करू शकत असे तर ते दोन घटक आहेत. एक शेतकरी आणि दुसरे प्रामाणिक करदाते
- याला तब्बल 90 हजार कोटींहून अधिक खर्च येणार आहे. यात गेल्या तीन महिन्यांचा खर्ज जमा केला तर दीड लाख कोटी इतका होईल
- एक राष्ट्र एक रेशन कार्ड याचा सगळ्या मोठा फायदा स्थलांतरित मजुरांना मिळू शकेल
- सरकारद्वारे या कुटुंबातील प्रत्येकाला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतील. त्याखेरीज प्रतिकुटुंब 1 किलो हरभरा डाळही मोफत दिले जातील
- 80 कोटी लोकांना तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळत राहिल
- हे सगळं पाहता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळीपर्यंत, अर्थात नोव्हेंबर अखेर पर्यंत केला जाईल
- पावसाळ्यात आणि नंतर प्रामुख्याने कृषी क्षेत्रात अधिक काम होतं. अन्य क्षेत्रांत तितकं होत नाही. जुलैपासून हळूहळू सणवार सुरू होतात. देशभरात विविध सण आणि उत्सव असतील. ही वेळ गरज आणि खर्च यांच्यात वाढ करते
- गरीब, पीडित, शोषित समाजासाठी आपलं सरकार झटत आहे
- अन्न पुरवठ्या संदर्भात आधी घेण्यात आलेला निर्णय दिवाळी पर्यंत लागू करण्यात आला आहे
- तसेच प्रतिकुटुंब एक किलो डाळही मोफत देण्यात आली.
- 80 कोटींहून अधिक कुटुंबांना गेल्या तीन महिन्यांत प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात आले.
- नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत
- गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी जनधन खात्यांमध्ये सरळ 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले
- लॉकडाऊन झाल्यानंतर लगेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली. त्यातून गरीबांना 2 लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं
- देश असो किंवा व्यक्ती, वेळेवर आणि संवेदनशील निर्णय घेतल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद अनेक पटींनी वाढते
- प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने हाच प्रयत्न केला की देशातलं कुणीही उपाशी राहू नये
- लॉकडाऊन दरम्यान प्रत्येक घरात चूल पेटेल हेच प्राधान्य राहिलं आहे.
- या देशात सामान्य असो वा पंतप्रधान कुणीही नियमांपेक्षा मोठं नाही
- 130 कोटी जीवांना वाचवायचं आहे
- देशात स्थानिक प्रशासनांनाही याच पद्धतीने काम करावं लागेल
- एका राष्ट्राध्यक्षालाही सार्वजनिक स्थळी मास्क न घालता जाण्यासाठी दंड भरावा लागला आहे.
- जर कुणी नियम पाळत नसेल, तर त्याला आपल्याला रोखायलाच हवं
- विशेषतः कन्टेन्मेंट झोनमध्ये याचं पालन केलं गेलंच पाहिजे
- सर्व नागरिक, सरकार, स्थानिक संस्था यांना पुन्हा काळजी घेण्याची गरज आहे.
- आपल्याला जास्त गरज असताना आपण अधिक निष्काळजीपणा करत आहोत.
- अनलॉक दरम्यान निष्काळजीपणा वाढत चालला आहे.
- अनलॉकच्या काळात अनेक जण नियम पाळत नाहीत असे दिसले
- अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत आहोत
- पावसाळा सुरू झाला आहे, सर्दी-ताप याकडे दुर्लक्ष नको
- पंतप्रधान मोदी यांचे संबोधन सुरू
- थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी संबोधन करणार
- पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे साऱ्या देशाचे लक्ष
- कोरोना, अनलॉक यासंदर्भात केंद्र सरकारची दिशा आणि धोरणं मांडण्याची शक्यता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण
























































