LIVE : वायनाड-रायबरेलीत हिंदुस्थान हरला का? मोदींचा काँग्रेसला सणसणीत सवाल

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून आल्यानंतर विरोधकांनी देश पराभूत झाला अशी भाषा वापरली होती. त्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींनी वायनाड-रायबरेलीत हिंदुस्थान हरला का?, असा खरमरीत सवाल केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर उत्तरादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील विकास कामांवर बोलतानाच मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

देशात झालेल्या पराभवामुळे राज्यसभेत बोलताना विरोधकांनी मोदी सरकारविरोधात राग आळवला. याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, देशातील जनता विरुद्ध विरोधी पक्ष अशी लढाई होती होती. या जनताजनार्दानाने मोदी सरकारला निवडून दिलं. पण इथे विरोधक म्हणाले की तुम्ही निवडणूक जिंकले, पण देश निवडणूक हरला. असं म्हणणे हा देशाचा, लोकशाहीचा अपमान आहे. जर आमच्या विजयाने देश हरला, लोकशाही हरली असेल तर वायनाड आणि रायबरेलीत हिंदुस्थान हरला का? अमेठीत हिंदुस्थान हरला का? काँग्रेस हरली म्हणजे देश हरला हा कोणता तर्क आहे, अहंकाराची देखील सीमा असते असे म्हणत मोदींनी काँग्रेसच्या विधानांवरून त्यांना चपराक दिली.

आपली प्रतिक्रिया द्या