
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षांच्या बैठका सुरू आहेत. पण सगळ्या देशाचे लक्ष लागले होते शुक्रवारी सुरू असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
- किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला
- विकासकामांना आम्ही कायम पाठिंबा दिला, तो सरकारला तर दिलाच पण जनतेच्या विकासाला पाठिंबा दिला
- आज जी विकासकामं झाली ती आमच्या पाठंब्याने झाली याचा अभिमान आहे
- शिवसेनेने कधी दगा दिलेला नाही
- त्यासाठी जर पंतप्रधान विनंती करत असतील तर ते योग्य आहे
- कोर्टाकडून न्याय मिळतोच, कुणाच्या हस्तक्षेपाशिवाय न्याय मिळाला तर त्याचा आनंदच आहे
- आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहेच
- मी बयानबाजी केली नाहीच, मी तमाम हिंदुंच्या भावना सांगितल्या
- आमचा विकासाला विरोध नाही, आरे असो की नाणार असो, आमची भूमिका स्पष्ट आहे
- जे मनात आहे ते जनात सांगितलेलं आहे
- सर्व फॉर्म्युला त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत सांगितला होता
- मी प्रत्येक वेळी उपहासात्मक कसं बोलेन
- ती यादी मी शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवेन
- मी आधीच सांगितलं होतं की मुख्यमंत्री शिवसेनेची यादी करून दोन दिवसांत पाठवतील
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू



























































