
सामना ऑनलाईन । तारापूर
तारापुर येथील अणुऊर्जा प्रकल्पात नोकरीपासून प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना दूर ठेवण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांचे कटकारस्थान आहे. कायमस्वरूपी नोकऱ्यांमध्येही भूमीपुत्रांना डावलण्यात येते, असा आरोप भूमीपुत्रांनी आज तारापूरमध्ये रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. मुजोर अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला न जुमानता आणि भूमीपुत्रांच्या मागण्या न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या बस वर काही जणांनी दगडफेक केली.
NPCIL व BARC मध्ये परप्रांतीय भरती मुळे प्रशासनाविरोधात स्थानिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. अनेकवेळा विनंती करून देखील भूमीपुत्रांना डावलून परप्रांतीयांची भरती केली गेली. याविरोधात स्थानिक रस्त्यांवर उतरले असून प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात येत आहे.
शेकडो तरुणांना प्रकल्प ३ आणि ४मध्ये नोकरीसाठी कॉल लेटर आले. असे असताना भरती प्रक्रियेमध्ये येथील युवकांना डावलण्यात आले. त्यातच परप्रांतीयांना आधी नोकरीत घेण्याचा घाट प्रकल्प अधिकारी घालत आहेत. त्यामुळे संतापाचा भडका उडाला, असे सांगण्यात येत आहे.
सोमवारी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आणि प्रकल्पात जाणाऱ्या वाहनांना अडवण्यात आले. परंतु मुजोर अधिकाऱ्यांनी वाहने घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून उपस्थित आक्रमक झालेल्या जमावाने बसच्या काचा फोडल्या.
वाचा अपडेट:
- शेकडो तरुणांना प्रकल्प ३व ४ मध्ये नोकरीसाठी कॉल लेटर आले असताना भरती प्रक्रियेमध्ये येथील युवकांना डावलण्यात आले
- अणुऊर्जा प्रकल्पात नोकरी पासुन प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना दूर ठेवण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांचे कटकारस्थान आहे
- कायमस्वरूपी नोक-यांमध्येही भूमीपुत्रांना डावलण्यात येते
- भूमीपुत्रांनी मांडल्या आपल्या व्यथा
- महिलांची संख्या लक्षणीय
- यावेळी स्थानिकांनी गाड्यांवर तुफान दगडफेक केली
- कंपन्यांच्या गेटवर ठिय्या आंदोलन

























































