#LokSabhaElections2019 पाचव्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 7 राज्यात 51 जागांसाठी सोमवारी सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सायंकाळी पाचपर्यंतच्या आकडेवारीनुसार प. बंगालमध्ये बंपर मतदान झाले आहे.

पाच वाजेपर्यंत झालेले मतदान –

  • बिहार – 52.86 टक्के
  • जम्मू-कश्मीर – 17.07 टक्के
  • मध्य प्रदेश – 61.93 टक्के
  • राजस्थान – 59.12 टक्के
  • उत्तर प्रदेश – 52.97 टक्के
  • प. बंगाल – 73.70 टक्के
  • झारखंड – 61.27 टक्के

दुपारी 3 वाजेपर्यंत देशात सरासरी 51% मतदान –

  • मध्य प्रदेश – 54.17%
  • उत्तर प्रदेश – 44.89%
  • बिहार – 44.08%
  • राजस्थान – 50.39%
  • जम्मू-काश्मीर – 15.64%
  • झारखंड 58.36%
  • पश्चिम बंगाल 62.84%
  • जम्मू कश्मीरधील उधमपुर येथे विशेष मतदान केंद्रात कश्मीरी पंडितांनी बजावला मतदानाचा हक्क

  • दुपारी 1 वाजेपर्यंत 7 राज्यांमध्ये  31.29% मतदान
  • मध्य प्रदेश – 31.46%
  • उत्तर प्रदेश – 26.53%
  • बिहार – 24.49%
  • राजस्थान – 33.82%
  • जम्मू-काश्मीर –  6.54%
  • झारखंड 37.24%
  • पश्चिम बंगाल 39.55%

  • राजस्थानच्या नोहारमध्ये 109 वर्षांच्या चौलीदेवी या आज्जीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

  • सकाळी 10 वाजेपर्यंत 7 राज्यांमध्ये  12.65% मतदान

  • मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेता आशुतोष राणा यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • लेहमध्ये मतदारांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

  • सकाळी 9 वाजेपर्यंत 7 राज्यात सरासरी 11.68 % मतदान
  • मध्य प्रदेश – 11.43 %
  • उत्तर प्रदेश – 9.82 %
  • बिहार – 11.51 %
  • राजस्थान – 13.37 %
  • जम्मू-काश्मीर – 0.80 %
  • झारखंड 13.46 %
  • पश्चिम बंगाल 15.19 %
  • बिहारमधील गोपाळपुरमधील नयागाव मतदानकेंद्रावर EVM मशीनची तोडफोड
  • केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे हजारीबागमधील उमेदवार जयंत सिन्हा यांनी केले मतदान.

  • झारखंडमधील हजारीबाग येथे 105 वर्षांच्या आज्जींनी केले मतदान, मुलाने खांद्यावर उचलून मतदान केंद्रापर्यंत नेले

  • जम्मू कश्मीरच्या पुलवामामधील एका मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपचे उमेदवार अर्जुन सिंग यांच्यावर चीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

  • जम्मू काश्मीरमधील पुलवामनध्ये मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, चोख बंदोबस्तात मतदान सुरुवात

  • उत्तर प्रदेशात बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये सपत्निक केलं मतदान

  • केंद्रीय राज्य मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी पत्नी गायत्री राठोड यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला

  • दिग्गजांचे भवितव्य मत पेटीत बंद होणार
  • मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, जम्मू-काश्मीर झारखंड, पश्चिम बंगाल या सात राज्यांमध्ये होत आहे मतदान.
  • लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात.
  • देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू