चेहऱ्यावर काळे डाग पडलेत? स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थाने चेहरा होईल नितळ आणि डागविरहित   

चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांमुळे त्वचेवर काळे डाग पडतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. ही समस्या बऱ्याच जणांना विशेषत: तरुण वयातील मुला-मुलींना भेडसावते. काही वेळा हे डाग चेहऱ्यावर तसेच राहण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून क्रिम लावूनही काही उपयोग होतोच असे नाही. चेहऱ्यावर पडलेले हे काळे डाग घालवण्यासाठी सोप्या घरगुती उपायांची मदत होऊ शकते. स्वयंपाकघरातीलच काही पदार्थांचा वापर यासाठी महत्त्वाचा ठरतो.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात बेसन पीठ असतंच. बेसन पिठाचा वापर त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. बेसन पिठात त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्याचे गुणधर्म आहेत. बेसन पिठामुळे त्वचेला फायदे होतात. त्वचा तजेलदार आणि तुकतुकीत व्हायला मदत होते.

बेसनाचे त्वचेला फायदे

–  बेसनाचा नियमित वापर केल्याने त्वचा घाण, विषारी पदार्थ आणि इतर अशुद्धीपासून मुक्त होते, त्यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ राहते.

–  बेसनाचे पीठ डागांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्वचेचा टोन देखील सुधारण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते चमकदार प्रभाव देते.

–  त्वचेतील सीबम पातळी संतुलित करण्यासाठी बेसन चांगले आहे. ते त्वचेचा नैसर्गिक ओलावा काढून टाकल्याशिवाय तेल काढून टाकते. यामुळे त्वचा मऊ राहायला मदत होते.

–  बेसन पिठात उत्तम एक्सफोलिएटिंग एजंट गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात. नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून देखील बेसन पीठ काम करते. यामुळे त्वचा टवटवीत आणि तजेलदार राहते.