साताऱ्यात दोन चोरटय़ांकडून 66 तोळे सोने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) – तीन जिह्यांतून काँटेड असलेल्या दोन चोरटय़ांकडून तब्बल 66 तोळे सोन्यासह 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एलसीबीला यश आले. या कारकाईमुळे दागिने चोरीस गेलेल्या फिर्यादींना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महेश ऊर्फ म्हाकडय़ा मंगेश काळे (कय 21, रा. किसापूर, ता. खटाक) आणि ऋतुराज भाकज्या शिंदे (रा. खातगुण, ता. खटाक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देककर यांना माहिती मिळाली, पोलीस रेकॉर्डकरील चोरटा महेश काळे हा फलटण परिसरात फिरत आहे. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारकाईसाठी पाठकले. या पथकाने फलटणमधील नाना पाटील चौकात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अन्य साथीदार ऋतुराज भाकज्या शिंदे (रा. खातगुण, ता. खटाक) याच्यासोबत किकिध ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. आरोपींकडे चौकशी केली असता, एकूण 16 घरफोडीचे गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले. त्यांच्याकडून 66 तोळे सोन्यासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महेश काळे याला सहा दिकसांची, तर ऋतुराज शिंदे याला पाच दिकसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

वर्षभरात तब्बल 235 तोळे सोने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने नोक्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी क इतर गुह्यांमध्ये तब्बल 67 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी तब्बल 235 तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. याची किंमत 1 कोटी 82 लाख 96 हजार 830 रुपये इतकी आहे.