फुकटय़ांकिरुद्धच्या मोहिमेत मध्य रेल्वेची 22 लाखांची दंडवसुली

मध्य रेल्वेने उपनगरीय लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये अनियमित प्रवास करणाऱयांविरोधात राबकिलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत  1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2020 या कालावधीत एकूण 4,911 प्रकरणे दाखल करीत 22 लाख 37 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

सध्या कोविड – 19 काळात अत्यावश्यक प्रवाशांसाठी लोकल चालविण्यात येत आहेत. तर लांबपल्ल्याच्या विशेष फेऱया चालविण्यात येत आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या तिकीट तपासणी पथकाने बेकायदेशीर प्रवास करणाऱयांविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात अनियमित प्रवासाची एकूण 2,244 प्रकरणे आढळून आली आणि त्यांच्याकडून दंड म्हणून रू.10 लाख 74 हजार रूपये वसूल करण्यात आले. दि.1 ते 17 सप्टेंबर 2020 या कालावधीत एकूण 2,667 प्रकरणे दाखल करण्यात येऊन 11 लाख 62 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशी एकूण 4,911 प्रकरणे दाखल करण्यात येऊन 22 लाख 37 हजारांचा दंड वसूल  करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या