मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खेळखंडोबा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल सेवा पुरती कोलमडली आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या तब्बल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाड ते कल्याण दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्या. यामुळे लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे सकाळच्या शिफ्टला वेळेत पोहोण्यासाठी निघालेल्याने कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागला.