कांजूरमधील रेडिमिक्स काँक्रीट प्लॅण्टमुळे स्थानिकांना धोका, प्लॅण्ट बंद करण्याची शिवसेनेची महापालिकेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांजूरमधील विकासकाने पंपनीच्या आवारात आरएमसी रेडिमिक्स काँक्रीट प्लॅण्ट सुरू केला आहे. मात्र काँक्रीटची वाहतूक करताना रस्त्यांवर रसायनमिश्रित सफेद पावडर पडत असून अवजड वाहनांमुळे खड्डेही पडले आहेत. त्यामुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याची दखल घेत हा प्लॅण्ट बंद करावा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे.

कांजूर येथे पूर्वी जिथे क्रॉम्प्टन ग्रीव्हज या बंद पडलेल्या जागेवर रुणवाल पंपनीने विविध रहिवासी प्रकल्प उभारले आहेत, मात्र पंपनीच्या आवारात आरएमसी रेडिमिक्स काँक्रीट प्लॅण्ट उभारला आहे. या काँक्रीटची वाहतूक शेकडो सायलो गाडय़ांतून होत असते. त्यामुळे कांजूर रेल्वे स्थानकांपर्यंच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून रसायनमिश्रित पावडरही रस्त्यावर विखुरलेली असते. नाक मुठीत पकडून पादचाऱयांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर पडलेल्या खड्डय़ांचा त्रास सर्वसामान्यांसह रिक्षाचालक, इतर वाहनचालकांनाही होत आहे. काही अपघातही झाले आहेत. त्यामुळे हा प्लॅण्ट बंद करा, अशी स्थानिकांची मागणी आहे. याची गंभीर दखल घेत रेडिमिक्स काँक्रीट प्लॅण्ट बंद करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.