
हिंदुस्थानात आतापर्यंत 2902 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशातील काही शहरात लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो असा अंदाज काही अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 537 रुग्ण असून आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की जर लोकांनी नियम गांभीर्याने नाही पाळले तर लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील शहरी भागात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो असेही टोपे म्हणाले.
या आठवड्यात संपूर्ण देशात टप्प्याटप्याने लॉकडाऊन हटवला जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. लॉकडाऊनवर केंद्र सरकार 14 एप्रिल रोजी बैठक घेणार आहे. ज्या राज्यात कोरोनाचे संकट गंभीर आहे तिथे लॉकडाऊन वाढवण्याचा सरकर विचारात आहे अशी माहिती अधिकार्यांनी दिली. मुंबई, बंगळूरू आणि दिल्लीसारख्या महानगरातून लॉकडाऊन हटवल्यानंतरच देशभरात टप्याटप्याने लॉकडाऊन हटवण्यात येईल.


























































