तू चाल पुढं तुला रं गड्या…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  प्रणव राकराणे, अभिनेता

लॉकडाऊनच्या चार-पाच दिवस अगोदरच झी गौरव सोहळ्याच्या नॉमिनेशन पार्टीसाठी मी लिखाण केलं होतं. या सोहळ्यात आमच्या ‘आटपाटी नाईट्स’ सिनेमाला तब्बल 15 नॉमिनेशन मिळाले होते. त्यामुळं आमच्या संपूर्ण टिमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अभिनेता म्हणून पहिलेवहिले नॉमिनेशन असल्यानं मलाही उत्सुकता होती. अचानक लॉकडाऊन जाहीर झालं अन् हा सोहळाच रद्द होतोय की काय असं वाटू लागलं. मधल्या काळात ‘आटपाटी नाईट्स’ला प्रतिस्पर्धी असलेल्या सिनेमांचा मी अभ्यास केला. आपण कुठे चुकलोय, इतर आपल्यापेक्षा कशाप्रकारे सरस आहेत अशा गोष्टी जाणून घेतल्या. यानिमित्तानं खूप सिनेमे बघितले. कालच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात आमच्या सिनेमाने सहा पुरस्कार पटकावले. एकंदरित शेवट गोड झाला असचं मी म्हणेन.

लॉकडाऊनच्या दिवसांबाबत बोलायचं तर मी रिकाम बसून राहण्यापेक्षा स्वत:ला वेगवेगळ्या कामांत गुंतवून ठेवलं होतं. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेसाठी संवादलेखन केलं. सिनेमासाठी दोन गोष्टी लिहून वाढल्या. अशारितीने माझंही ‘कर्क प्रॉम होम’ सुरू होतं. हे सगळ करताना कुटूंबियांना वेळ देणं, घरकामात मदत, शरीरस्काथ्यासाठी व्यायाम-प्राणायाम करणंही सुरू असायचं. कामासाठी सतत घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणाऱया माणसांच्या बिझी आयुष्याला ब्रेक लावण्याचं काम कोरोनाने केलंय. आपण आयुष्यात नेहमी भविष्याचा विचार करतो. मागे कळून बघालयाही आपल्याकडं वेळ नसतो. सर्कांना मिळालेला हा निवांत वेळ म्हणजे मागे कळून बघण्यासाठी आणि भूतकाळातील चूका सुधारून भविष्यात दोन पाऊलं पुढं जाण्याची संधीच होती. त्यामुळं कोरोनाला घाबरू नका. आलेल्या वेळेचा सदुपयोग करा. कारण पुन्हा सगळं पूर्ववत झाल्यावर आपण नव्या जोमानं कामाला लागू त्यावेळी आपण परिपूर्ण असू.

पिक्चर अभी बाकी है!

कोरोनामुळं सगळचं जग थांबलंय असं आपण म्हणतो. परंतू जग हे कुणासाठीच थांबत नसतं. यापूर्वीही अनेक संकटे आली, पण माणूस कधीच थांबला नाही. संकटावर मात करत पुढं चालत राहणं ही आपली कृत्ती आहे. माणसातली हीच पॉझिटीव्ह गोष्ट आहे. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा आपल्याला चालायचंय हे आपल्याला माहितच आहे. मग आता लॉकडाऊनमुळे जरा कुठे थांबलोय म्हणून चिंता कसली करताय? आपणं दोन पाऊलं मागे आलोय ते उंच झेप घेण्यासाठी. उलट या काळात चालण्याऐवजी आपण पळण्यासाठीची एनर्जी गोळा करूया. सिनेमाप्रमाणं मध्यंतर असून ’पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.’