31 जुलैपर्यंत ‘जैसे थे’, महाराष्ट्रात तूर्त निर्बंध कायम

mantralay

कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 30 जून रोजी संपत असलेला लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढवत ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱया टप्प्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या टप्प्यात राज्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत ते जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने आता सशर्त उघडणार आहेत. एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱयांना दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्पेटपर्यंतत जाता येईल, मात्र दूर जाता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणत अर्थचक्राला गती देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली आहे. रवारपासून राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतरत्र टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणात राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये जिल्हा व पालिका क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

 • शैक्षणिक – शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात. ऑनलाईन व दूरशिक्षणास परवानगी असेल.
 • कार्यालय उपस्थिती – सरकारी कार्यालयांत (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी उपस्थित राहतील. खासगी कार्यालयांत 10 टक्के किंवा 10 कर्मचारी कार्यरत राहतील.

मिशन ‘बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा जाहीर

 • अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार.
 • इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील.
 • मॉल आणि मार्पेट काॅम्पलेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील.
 • मद्य दुकाने सुरु करण्यास परवानगी असल्यास उघडतील. अन्यथा होम डिलिव्हरीसाठी परवानगी
 • आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-काॅमर्स विक्री.
 • औद्योगिक काम सुरु राहतील
 • खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट किंवा मान्सूनपूर्व काम करण्यास परवानगी
 • रेस्टॉरंट, किचन होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
 • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
 • केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
 • लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मेळावा मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉलमध्ये घेण्यास परवानगी
आपली प्रतिक्रिया द्या