
मध्य रेल्वेच्या अमन लॉज ते माथेरान अशा चालविण्यात येणाऱया शटल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून 66 दिवसांत या सेवेला तब्बल 53 हजार 679 प्रवाशी लाभले आहेत. मुंबईच्या अगदी जवळ असलेले हे थंड हवेचे ठिकाण लॉकडाऊनमध्ये पर्यटकांना सोयीचे ठरले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली माथेरानची मिनी ट्रेन 4 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन सध्या अमन लॉज (दस्तुरी नाका) ते माथेरान अशी शटल स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.
4 नोव्हेंबरपासून चार शटल फेऱयांच्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या सेवेला 53,679 प्रवाशी तर 5,864 पार्सलची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
























































