
राज्यातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असल्याने हवेत गारठा वाढला आहे. मुंबईतही आज किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आगामी काही दिवसांत तापमान घटून गारठा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते पाच अंश सेल्सिअस इतकी घट झाल्याचे चित्र आहे. दिवसा हवामान ढगाळ, कोरडे आणि काहीसे उष्ण असले तरी रात्री आणि पहाटे गारठा वाढत आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांमध्ये थंड व कोरडे हवामान असून 18 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. पुढील चार ते पाच दिवस या भागात दिवसा कोरडे तर रात्री थंड हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.



























































