रमजान महिन्यात घरातच नमाज पठण करा; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिम समाजातील पवित्र महिना रमजान 25 एप्रिलपासुन सुरुवात होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा नियम पाळला जावा म्हणुन या लॉकडाऊनच्या काळात घरातच नमाज अदा करावी असे, आवाहन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले आहे.

रमजानच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यानी येथील मुस्लिम समाजाचे धर्मगुरुची बैठक टिपु सुलतान चौक येथे 22 एप्रिल रोजी  घेण्यात आली. यावेळी शासनातर्फे देण्यात आलेली नियमावली चा मुस्लीम बांधवानी पालन करावे  ईफतार, तरावी नमाजसाठी एकञ येऊ नये या बाबत मार्गदर्शन केले व रमजान महिण्यात येणाऱ्या अडचणी जाणुन घेतल्या यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गोपीनिय शाखेचे मुजाभाउ पायघन, नारायण थमके, मुस्लिम सामाजाचे धर्मगुरु मुफ्ती म. इसाक सहाब, मौलाना सलिम सहाब, मोलाना मुजाहिद, मोलाना असलम, हाफेज अकबर, हाफेज मेराज, माजी नगरसेवक नियामत खान,समाजसेवक शेख मुस्ताक,  शफिक बापु  उपस्थित होते.