लातूर जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन; पोलीस बंदोबस्त तैनात

1104

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यात कडकडीतपणे बंद पाळण्यात येणार असल्याने विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. दररोज वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन आजपासून जिल्ह्यात संचारबदीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच लातूर शहरातील रस्त्यांवर पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनाच फिरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी कडक संचारबंदीची अंमलबजावणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. लातूर शहरात पोलिसांसोबतच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही रस्त्यावर उतरले आहेत. संचारबंदीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या