29 ऑगस्टपर्यंत पश्चिम रेल्वेने 421 कोटींचा रिफंड परत केला

ac-local-train

कोरोना लॉकडाऊनने 22 मार्चपासून सर्व पॅसेंजर ट्रेन ठप्प झाल्या. त्यानंतर अडकलेल्या मजूरांसाठी 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. अनलॉक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या 230 लांबपल्ल्याच्या स्पेशल ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या ट्रेनच्या तिकीटांचा रिफंड आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट काढणाऱयांच्या खाती जमा झाला. परंतू ज्यांनी पीआरएस काऊंटरकरून तिकीटे खरेदी केली होती. त्यांच्यासाठी 27 मेपासून मोजक्या पीआरएस केंद्राकरून कोणाताही कॅन्सलेशन चार्जेस न आकारता तिकीटांचा रिफंट वाटप सुरू करण्यात आला. 1 मार्च ते 29 ऑगस्टपर्यंत पश्चिम रेल्केने 421 कोटींचा रिफंड परत केला आहे.

मुंबई डिव्हीजनमध्ये 203 कोटीचा रिफंड दिला

पश्चिम रेल्वेला लॉकडाऊनमुळे एकूण 2350 कोटीच्या महसुलाकर पाणी सोडावे लागले आहे. त्यातील 355 कोटी उपनगरीय सेवेचा तोटा तर 1995 कोटी रूपयांचा तोटा नॉन सबर्बन सेक्शनमुळे झाला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. इतका तोटा होऊनही रेल्वे प्रवाशांना त्यांच्या तिकीटांचा संपूर्ण रिफंड देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने आतापर्यंत 203 कोटींहून अधिक रिफंड प्रकाशांना दिला आहे. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवरील 65 लाख प्रवाशांनी त्यांची तिकीटे रद्द झाल्याने रिफंड घेतला असल्याचेही पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. 23 मार्च ते 29 ऑगस्टपर्यंत पश्चिम रेल्वेने 503 पार्सल स्पेशल ट्रेनद्वारे 1.10 लाख टन मालाची वाहतूक केली असून त्यात कृषीजन्य वस्तू, औषधे, मासे आणि दुध अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या वाहतूकीतून 36.28 कोटी रूपयांचा महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या