
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने लोकसभा निवडणुकांसदर्भात केलेल्या ट्वीट नंतर महत्वाचा खुलासा केला आहे. आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्याने ट्वीट करून स्पष्ट केले आहे.
Contrary to the rumours I am not contesting elections nor campaigning for any political party..
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2019
माझ्या संदर्भात काही अफवा पसरवल्या जात आहेत. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, असे सलमानाने ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आज सकाळीच सलमान खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट रिट्वीट करत जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर सलमान खान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे सलमानने पुन्हा एकदा ट्वीट करत खुलासा केला आहे.
लोकसभा निवडणुकीआधी सलमानचं ट्वीट, नेटकऱ्यांकडून तुफान रिट्वीट



























































