Lok Sabha Election 2024 – काँग्रेसकडून आणखी एक यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला दिले तिकीट

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यात त्यांनी आंध्र प्रदेशमधील पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहिण वाय एस शर्मिला रेड्डी यांचाही समावेश आहे. शर्मिला यांना काँग्रेसने कडप्पा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

काँग्रेसने या यागीत पाच आंध्र प्रदेशमधील, तीन बिहार, आठ ओडीशा आणि एक पश्चिम बंगालमधील उमेदवाराची घोषणा केली आहे. यात आंध्र प्रदेसमधून काँघ्रेसने कडप्पा मतदारसंघातून शर्मिला रेड्डी यांना तिकीट दिले आहे. जानेवारी महिन्यात वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष वायएस तेलंगणा पार्टीला (वायएसटीपी) काँग्रेस पक्षात विलीन केले आहे. त्यानंतर त्यांना आंध्र प्रदेशच्या काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले.