
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री गिरीष बापट यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बापट यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला. दुपारपर्यंतच्या मतमोजणीमध्ये बापट हे तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांनी ही आघाडी कायम राखली.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वडगाव शेरी, शिवाजी नगर, कोथरकूड, वर्वती, पुणे कन्टोनमेंट आणि कसबा पेठ ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला होता.
2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5,69,825 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक काँग्रेसच्या पतंगराव कदम यांना 2,54,056 मतं मिळाली होती. 2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी विजय मिळवला होता. सुरेश कलमाडी यांना 2,79,973 मतं मिळाली होती, तर भाजपच्या अनिल शिरोळे यांना 2,54,272 मतं मिळाली होती.



























































