
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रासह 14 राज्यांतील 115 मतदारसंघांमध्ये मंगळवारी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
ओवेसी, सगळे मुसलमान तुझ्या बापाचे नोकर नाहीत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. रविवारी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी अखेरचा दिवस होता. राज्यात विविध ठिकाणी प्रमुख पक्षाच्या सभा पार पडल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा येथे सभा घेतली.
रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये 12 उमेदवार मैदानात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात असून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 54 हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
पहिल्या बॉलवर आऊट होणाऱ्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये, मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेस आघाडीच्यावतीने नविनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस,नीलेश भातडे रिंगणात आहेत.




























































