अग्निवीर योजना फाडून कचऱयात टाकू

इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना फाडून कचऱयात फेकू अशी गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील झाँसी येथील प्रचारसभेत बोलताना दिली. आपल्याला दोन शहीद नकोत. एकाला शहीदाचा दर्जा मिळणार, पेन्शन मिळणार, त्यांच्या पुटुंबीयांचे संरक्षण करणार आणि दुसऱयाला शहीदाचा दर्जा मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही, त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण होणार नाही, अशी अग्निवीर योजना आम्हाला नकोय, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

ही योजना हिंदुस्थानच्या सैन्याला नकोय. ही योजना मोदींनी अदानींची मदत करण्यासाठी बनवली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशात डिफेन्स कॉरीडॉरसाठी जमीन घेण्यात आली. इथे डीफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, सुरू झाले का… नाही. अदानींना जमीन दिली, पण, इथे पुठलीच फॅक्टरी सुरू करण्यात आली नाही. तुम्हाला मोदी आणि शहा यांनी मूर्ख बनवलेय. हेच सत्य आहे, भाजपचे लोक टेम्पो घेऊन फिरत आहेत. विमानतळ, रेल्वे, डीफेन्स इंडस्ट्री विपून टाकली 22 अब्जाधिशांना, तुम्हाला काय मिळाले, देशातील तरुणांना काय मिळाले हे सांगा, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

मोफत धान्य योजना काँग्रेसने आणली

मोफत धान्य योजना काँग्रेस सरकारने आणली होती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्याअंतर्गत अधिक, चांगल्या दर्जाचे रेशन देऊ, असे सांगत गरीब, शेतकरी आणि कमपुवत लोकांचे सरकार बनवायला हवे. अंबानी-अदानी सरकार हटवायला हवे, असेही राहुल गांधी म्हणाले.