लोकसभा निवडणुकीनिमित्त गूगलच्या पेजवर खास डुडल

सर्च इंजिन गुगल नेहमी एखादा खास दिवस डूडलवर अनोख्या पद्धतीने साजरा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतो. असेच काहीसे आजही केले आहे. देशभरात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडतं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 49 जागांसाठी मतदान होत आहे. यानिमित्त गुगलने निवडणुकीचे खास पद्धतीने डूडलही बनवले आहे.

पाचव्या टप्यातीस 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 49 जागांसाठी मतदान होत आहे. या निमित्ताने गुगलने निवडणुकीच्या निमित्ताने खास गुगल डूडल बनवले आहे. दरवेळीप्रमाणे गुगल डूडलने बोटावर लावलेली शाई दाखवली आहे. देशात सात टप्प्यात मतदान होत आहे. याचबरोबर प्रत्येक टप्प्यातील निवडणूक गुगलच्या डूडलवर अगदी खास पद्धतीने साजरे केले आहे. गुगल डूडलवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणीची पद्धत जाणून घेता येईल. नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी सामान्य मतदारांना फॉर्म 6 भरण्याची गरज आहे. प्रवासी भारतीय मतदारांना फॉर्म 6ए भरण्याची गरज आहे. मतदार यादीतून नाव काढून टाकण्यासाठी किंवा त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी फॉर्म 7 भरावा लागेल. निवासस्थान बदलण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी / EPIC बदलण्यासाठी / अक्षम म्हणून चिन्हांकित करण्यासाठी फॉर्म 8 भरावा लागेल.

2024 ची ही 18 वी लोकसभा निवडणुक आहे. लोकसभेसाठी 543 सदस्यांची निवडणूक होईल आणि 1 जून नंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. गूगलने आपल्या डूडलवर एक लाल रंगाचा ठिपका दिसतोय. त्यावर क्लिक केल्यावर निवडणुक 2024 असे कॅप्शन लिहित गूगल डूडलने सोशल मीडिया अकाऊंडवर शेअर केले आहे.