Lok Sabha Election 2024 : वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो… रोहित पवारांचा टोला

अजित पवार गटाकडून वेळोवेळी शरद पवार यांच्या वयावरून टिप्पण्णी केली जाते. शरद पवार देखील या टीकांचा कायम खरपूस समाचार घेत असतात. दरम्यान शनिवारी रोहित पवार यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक इंजिन वंदे भारत ट्रेनला खेचून घेऊन जात आहे. या व्हिडीओसोबत पोस्ट शेअर करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. ”वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो. काँग्रेसच्या जुन्या काळातील अस्सल इंजिन भाजपच्या आजच्या काळातील कथित ‘विकासा’च्या इंजिनाला ओढून नेतानाचा आणि मोलाचा संदेश देणारा व्हॉटस्ॲपवर आलेला हा व्हिडिओ’, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

हा गडी थांबणारा नाही

अजित पवार गटाकडून वेळोवेळी शरद पवार यांच्या वयावरून टिप्पण्णी केली जाते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या टिप्पण्णीचा समाचार शरद पवार यांनी घेतला. अनेकजण माझं वय 84, 85 झालं असं म्हणतात. 85 वर्षांचा योद्धा काय करणार? असंही म्हणतात. त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिले आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली त्यांना वाऱयावर सोडणारा नाही. तुमच्यासाठी शेवटपर्यंत काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे पवार यांनी सांगितले.