Lok Sabha Election 2024 : राज ठाकरेंचा महायुतीला फारसा फायदा होणार नाही, रामदास आठवले स्पष्ट बोलले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचा महायुतीला फारसा उपयोग होणार नाही असे माझे आधीही मत होते आणि आताही आहे, असे पेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आज आयोजित केलेल्या ‘निवडणूक वार्तालाप’ या कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आता ते सोबत आले आहेत तर त्यांचे स्वागत आहे. मुंबई, नाशिक आदी शहरी पट्टय़ात त्यांच्या पाठिंब्याचा उपयोग होईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

जातीनिहाय जनगणना

आपला मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा आहे. जातीनिहाय जनगणनेत जरी तांत्रिक अडचणी असल्या तरी देशभरात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे रामदास आठवले म्हणाले.