कल्याण लोकसभा मतदारसंघ मिंधेच्या हातून जाणार? राजकीय वर्तुळात चर्चा

भाजपसोबत सत्तेचा संसार थाटण्यासाठी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटाला आता भाजपच्या अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीची झलक दिसू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ मिंधे गटाच्या हातून जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपनेच कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाटेत काटे पेरून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागलेला असला तरी अद्याप जागावाटप झालेलं नाही. त्यामुळे आता इथे भाजपचा उमेदवार उभा राहतोय की मिंधे गटाचा, हे अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे इथे भाजप विरुद्ध मिंधे गट अशी लढत होऊ शकेल अशी शक्यता आहे.