
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही मराठी वृत्तवाहिनी आज शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून 72 तास बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केले आहेत. मोदी सरकारच्या या कारवाईचा विविध पत्रकार संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असताना आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार, असे ‘लोकशाही’चे संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले.

























































