
सामना ऑनलाईन। लंडन
पंजाब नॅशनल बँकेला 13,700 कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा लंडनमध्ये असल्याचा हिंदुस्थानच्या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण फरार झालेला नीरव मोदी लंडनमधील रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरताना पहिल्यांदाच दिसला आहे. दाढी-मिशा वाढवलेल्या नीरवचे वजनही वाढले असून हिंदुस्थानमधील गुप्तचर यंत्रणा आपल्या शोधात आहे याची किंचितशी चिंताही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, असे स्पष्ट दिसत आहे.
Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India’s historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019
दाढी मिशा वाढवून स्वत:ची ओळख लपवू पाहणारा नीरव इथल्या रस्त्यावर निवांतपणे फिरत होता. पण काही जणांनी त्याला ओळखले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने नीरववर प्रश्नांची सरबत्ती केली. तू सध्या कुठे राहतोयस, तू इंग्लड सरकारकडून राजकीय संरक्षण मागितले का, तू @ नावाने आजही हिरे व्यापार करतोय असे ऐकलंय हे खरं आहे का, तू किती दिवस येथे राहणार आहेस, प्रत्यापर्णाबद्दल तूला काही कळलंय का, असे अनेक प्रश्न पत्रकाराने नीरवला विचारले. पण प्रत्येक प्रश्नावर नीरवने शांतपणे नो कमेंटस अशीच प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, नीरव विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली असतानाही इंग्लडचे अधिकारी त्याची योग्य ती दखल घेताना दिसत नाही. यामुळे हिंदुस्थानची गुप्तचर यंत्रणा नाराज असून नीरवच्या प्रत्यापर्णाबद्दल त्यांना प्रस्तावही पाठवला आहे. त्यानंतर इंग्लंड पोलिसांनी नीरवला अटक करणे अपेक्षित होते. जेणे करून त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करता आली असती. पण इंग्लंड पोलीस याकडे कानाडोळा करत असून नीरव अजूनही मोकाट आहे. असे ईडीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. नीरव मोदीला अटक करण्यासाठी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा पत्रही लिहली. पण तरीही लंडनच्या अधिकाऱ्यांनी नीरव विरोधात अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही.
पंजाब नॅशनल बँकेची 13,700 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने नीरव मोदीची 147.72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याव्यतिरिक्त मोदी समूहाशी संबंधित 489.75 कोटी रुपयांचे दागिने, हिरे, व इतर महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत. नीरवचा अलिबाग येथील बेकायदेशीर बंगला नुकताच जमिनदोस्त करण्यात आला.

तर दुसरीकेड लंडनमध्ये दिसलेल्या नीरव मोदीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य़ केले आहे. पत्रकाराला नीरव दिसतो मग तुम्हांला का नाही असा सवाल काँग्रेसकडून मोदी सरकारला करण्यात आला आहे.
Journalists of the @telegraph managed to track down Nirav Modi. Why was the Modi Govt unable to do so? Who is Modi trying to protect? Himself, Nirav Modi or the people who let him escape? https://t.co/Rp6BFNh3zt
— Congress (@INCIndia) March 9, 2019


























































