टीम इंडियाचे ‘जंगल जंगल पता चला है’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। साऊदम्पटन

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा विश्वचषकातला पहिला पेपर 5 जूनला पार पडणार आहे. प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेसारखा चॅलेंजिंग संघ आहे, पण पहिल्या लढतीआधी मैदानात सर्व न करता हिंदुस्थानी संघ चक्क जंगलसफारीचा आनंद घेतोय. फरक इतकाच की फक्त फिरणे नाही तर विशिष्ट वेळात क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर संघाकडून क्षेत्ररक्षणाचा कसून सराव करून घेत आहेत. स्विंग गोलंदाजीसाठी माहीर मानला जाणारा भुवनेश्वर आपल्या गोलंदाजीत काही नवे प्रयोग करता येतील का याचा मनापासून अभ्यास करीत आहे. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला एक आगळी कल्पना सुचली. मग काय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही ‘आयडियाची कल्पना’ प्रत्यक्षात आणली. टीम इंडिया क्रिकेट स्टेडियमऐवजी थेट साऊदम्पटनच्या जंगलात पोहोचली..तेथे प्रसन्न आणि मस्त नैसर्गिक वातावरणात हिंदुस्थानी संघाने नेट लावून क्षेत्ररक्षणाचा कसून सर्व केला. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांनी खेळाडूंना नवनव्या फिल्डिंग टिप्स देत सरावात आगळी रंगत भरली.

जंगलात मौजमस्ती, रंगला पेंटबॉलचा गेम
जंगलातील निसर्गरम्य वातावरणात टीम इंडियाच्या सदस्यांनी जंगलात फिरण्यासोबतच मौजमस्तीचाही मनमुराद आनंद लुटला. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, दीपक चहर यांनी पेंटबॉल गेम खेळून आनंद साजरा केला. बीसीसीआयने ट्विट केलेल्या एका फोटोत महेंद्रसिंह धोनी आणि युजवेंद्र चहल जोरदार मौजमस्ती करताना दिसत होते.