लोणी काळभोरमध्ये चार मोटारींसह दोन दुचाकींचे नुकसान, चोरट्यांचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणी काळभोर परिसरातील कदम वाकवस्ती परिसरात चोरट्यांनी चार मोटारींचे डॅशबोर्ड तोडून दोन दुचाकींचे लॉक काढून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 5 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नितीन खटाटे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन खटाटे कदम वाकवस्तीवर राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी अज्ञातांनी त्यांची मोटार चोरी करण्याच्या उद्देशाने डॅशबोर्डचे नुकसान केले. त्याशिवाय इतर तीन मोटारी आणि दोन दुचाकी चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे तपास करीत आहेत.