
ऐन निवडणुकीआधी केंद्र सरकारचा निर्णय उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आल्याने आता ग्राहकांना स्वस्तात गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लाभार्थ्यांना आता दोनशे रुपयांऐवजी तीनशे रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर 600 रुपये किमतीत मिळू शकणार आहे, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्राने गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याचे बोलले जात आहे.


























































