#MeToo सगळ्यांनी मजा केली, आनंद लुटला, तेव्हा का नाही बोललात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

#MeToo मुळे देशभरात निर्माण झालेले वादळ शमत असतानाच प्रसिद्ध गायक लकी अली यांनी या चळवळीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी आधी मजा केली,आनंद लुटला., तेव्हा का नाही बोललात असा सवाल त्यांनी आपल्याबरोबर गैरवर्तन झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलांना केला आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी #MeToo बद्दल आपले मत व्यक्त केलं आहे.

ज्यांच्याबरोबर गैरवर्तन झाले. त्या महिलांनी आधीच तोंड उघडलं असतं तर अनेक वाईट घटना त्याचवेळी समोर आल्या असत्या. आता यात करणार. कारण सगळ्यांनीच मजा केली आहे. आता त्यांची पोलखोल होत आहे. पण हे सगळं खूपच हास्यास्पद आहे. कारण आता सगळ्यांनाच आठवतयं की माझ्याबरोबर काय झालं. पण हे सगळं आधीच का नाही सांगितले. शेवटी वाईट कामं ही समोर येतातच. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा. पण चुकीच्या गोष्टी या समोर येतातच. त्यातच आता तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे बरेच बदल झालेत. आता कामात दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस होऊ लागला आहे. असेही अली यांनी म्हटले आहे. ट्रोल झाल्यास त्या परिस्थितीला आपल्या पद्धतीने हाताळाव लागतं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सध्या बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचही ते म्हणाले आहेत.