आर्थर रोड जेलमध्ये हॉटेलच्या स्युटसारखा अलिशान सेल; चोक्सीसाठी चोख व्यवस्था, बेल्जियम न्यायालयाला हिंदुस्थानची माहिती

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात परत आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. औया हायप्रोफाइल गुन्हेगारासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जेलमधील त्याचा सेल एखाद्या हॉटेलच्या स्युटसारखा बनवण्यात आला आहे. हिंदुस्थान सरकारने बेल्जियम न्यायालयाला ही माहिती दिली आहे.

हिंदुस्थान सरकारच्या पाठपुराव्यानंतर बेल्जियम सरकार चोक्सीचे प्रत्यर्पण करण्यास तयार झाले आहे. मात्र, तुरुंगात त्याला युरोपियन दर्जाच्या सुविधा मिळाव्यात अशी अट बेल्जियम न्यायालयाने घातली आहे. त्यानुसार, आर्थर रोड जेलमध्ये सुविधा देण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानच्या सरकारी वकिलांनी याचे पह्टोही न्यायालयात सादर केले आहेत. चोक्सीला बॅरॅक क्रमांक 12 मधील एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

चोक्सीला काय सुविधा मिळणार?

नैसर्गिक प्रकाश मिळावा म्हणून तीन खिडक्या हवा खेळती राहण्यासाठी पाच झडपा आणि तीन सिलिंग फॅन.

नैसर्गिक सूर्यप्रकाश नसताना पुरेसा उजेड मिळण्यासाठी सहा टय़ूबलाइट्स

बातम्या आणि मनोरंजनासाठी टीव्ही.

इंग्लिश कमोडसह सर्व सुविधांनी युक्त असे टॉयलेट

बराकीबाहेर 24 तास पोलीस बंदोबस्त

सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारता यावा यासाठी बराकीच्या बाहेर पुरेसा लांब आणि रुंद असा ऐसपैस कॉरिडॉर.