…तर महाराष्ट्राची चार छोटी राज्य होतील – मा.गो.वैद्य

6815

‘कोणत्याही राज्याची लोकसंख्या ही तीन कोटी पेक्षा जास्त नको. तसं झालं तर महाराष्ट्राचे विभाजन होऊन त्याची चार छोटी राज्य होऊ शकतील’, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विभाजनाचा वाद उफाळणार आहे. वैद्य यांनी टिव्ही 9 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘माझ्या आधीच्या एका लेखात म्हटलं होतं की कोणत्याही राज्याची लोकसंख्या 3 कोटींवर तसेच 1 कोटींपेक्षा कमी नसावी. महाराष्ट्राची लोकसंख्या जर सुमारे 12 कोटी असेल तर महाराष्ट्राची चार राज्य होतील.  या राज्यांमध्ये विदर्भ वेगळा होऊ शकतो.  महाराष्ट्राचे तीन किंवा चार भाग झाले तरी महाराष्ट्र  हिंदुस्थानातच राहिल’, असे मा.गो. वैद्य यांनी टीव्ही9 ला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या