असं झालं तर… ‘यूपीआय’ने चुकीच्या व्यक्तीला पेमेंट झाले तर

1 आजकाल यूपीआयमुळे काही क्षणात पैसे ट्रान्स्फर करता येतात. मात्र, चुकीच्या ठिकाणी पेमेंट झाले तर, पैसे कसे परत मिळतील, याचे टेन्शन येते.

2 आरबीआयने यासंदर्भात एक सर्क्युलर जारी केले आहे. पैसे ज्याला दिले, त्याचे आणि पैसे देणाऱ्याचे खाते एकाच बँकेत असल्यास लवकर रिफंड मिळू शकतो.

3 ज्याला पैसे पाठविले, त्याला संपर्प करून चुकीच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. त्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले तर पुढचा त्रास टळतो.

4 पैसे परत करण्यास नकार दिला तर 18001201740 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा. यूपीआय अॅपच्या ग्राहक सेवेशी संपर्प करा

5 यासंदर्भात तुम्ही बँकेला संपर्क करून तक्रार करू शकता. एनपीसीआयकडे देखील तक्रार करू शकता, जेणेकरून पैसे लवकर परत मिळतील.