माढा कोर्ट परिसरात चाकूचा धाक दाखवत चोरी, साडे सात लाखांचा ऐवज लंपास

माढा येथील कोर्टाच्या पाठीमागे रहात असलेले अमरादिप भांगे यांच्या घरी चाकूचा धाक दाखवून पहाटे तीन वाजता एकूण 7 लाख 61 हजारांची जबरी चोरी करण्यात आली. या बाबत माढा पोलीस ठाण्यात अमृता जगताप (वय 36 )या त्यांच्या मुलीने फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धारशिवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकही घराच्या परिसरातच घुटमळत राहिले.

या बाबत फिर्यादि नुसार अधिक माहिती अशी की, अमरदीप भांगे यांच्या राहत्या घरी पहाटे तीन सुमारास जिनाच्या मार्गाने चार चोर घरामध्ये शिरले त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तिघांनी घरातील लोखंडी कपाटातून चार तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण, चार तोळ्यांच्या बांगड्या, पाच तोळ्याचे लॉकेट, दोन तोळ्याचे छोटे गठण,कानातील तीन जोड, 1 ग्राम चा कळस, 2 ग्राम बदाम ,एक सॅमसंग मोबाईल असा एकूण 7, 61000 रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. या सदर घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे

आपली प्रतिक्रिया द्या