भाजपच्या पोस्टरवर मोदी-शहांसोबत ज्योतिरादित्य सिंधीया, चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यामध्ये सध्या विस्तव जात नाही. मध्य प्रदेशमधील कर्जमाफीवरून ज्योतिरादित्य सिंधीया सध्या सतत काँग्रेस सरकारला घरचा आहेर देत आहेत. त्यात ज्योतिरादित्य यांनी जम्मू कश्मीरमधूल कलम 370 हटविण्याच्या भाजपच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसने संपूर्ण कर्जमाफी केलीच नाही, बड्या नेत्यानेच केली पोलखोल

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या काँग्रेस विरोधी वागण्यावरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच शुक्रवारी मध्य प्रदेशमधील भिंड येथे भाजपने ज्योतिरादित्य सिंधीया यांचे आभार मानणारे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर सिंधीया यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा याचे देखील फोटो आहेत.

भाजपचे भिंडचे जिल्हा संपर्कप्रमुखांनी सिंधीया यांचे हे पोस्टर लावले आहे. या पोस्टरमधून त्यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल सिंधीया यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे सिंधीया हे भाजपच्या वाटेवर आहेत की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.